Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ राजे 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा त्याचे सेवक त्याला म्हणाले, “आमच्या स्वामीराजांसाठी एखादी तरुण कुमारी पाहावी; तिने तैनातीला राहून आमच्या स्वामीराजांची शुश्रूषा करावी आणि त्यांना ऊब यावी म्हणून त्यांच्या उराशी निजावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणून त्याचे सेवक त्यास म्हणाले, “आपण आपल्या प्रभूराजासाठी एखादी तरुण कुमारी पाहूया. अशासाठी की तिने राजाची सेवा करावी आणि काळजी घ्यावी. आपल्या प्रभूराजाला ऊब यावी म्हणून ती तुझ्या उराशी निजेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 म्हणून त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी आपण एक तरुण कुमारी शोधू या. तिने त्यांच्याजवळ झोपावे म्हणजे आमच्या स्वामींना ऊब येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ राजे 1:2
11 Iomraidhean Croise  

तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी; मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे, परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.”


पण त्या गरिबाजवळ एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते; ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली; ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पीत असे व त्याच्या उराशी निजत असे; ती त्याची मुलगीच बनली होती.


दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता; ते त्याच्यावर पांघरुणे घालत तरी त्याला ऊब येत नसे.


मग त्यांनी सर्व इस्राएल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला; तेव्हा त्यांना शुनेमकरीण अबीशग नावाची एक कुमारी आढळली. तिला ते राजाकडे घेऊन आले.


मुलांनो, आता हयगय करू नका, कारण तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहावे, त्याची सेवाचाकरी करावी व त्याचे सेवक होऊन धूप जाळावा म्हणून परमेश्वराने तुम्हांला निवडले आहे.”


मग त्याची सेवाचाकरी करणारे त्याचे सेवक त्याला म्हणाले, “राजासाठी तरुण व सुंदर कुमारींचा शोध करावा;


दोघे एकत्र निजले तर त्यांना ऊब येते; एकट्याला ऊब कशी येईल?


सोबत्याचा भरवसा धरू नकोस, जिवलग मित्रावर अवलंबून राहू नकोस, तुझ्या उराजवळ निजणार्‍या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर.


परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्यासाठी परमेश्वरासमोर उभे राहून त्याची सेवा करायला व त्याच्या नावाने आशीर्वाद द्यायला त्या वेळेस परमेश्वराने लेवी वंशाला वेगळे केले; ते आजवर चालू आहे.


तुझा भाऊ म्हणजे तुझा सहोदर, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझी प्राणप्रिय स्त्री, तुझा जिवलग मित्र ह्यांच्यापैकी कोणी तुला व तुझ्या पूर्वजांना अपरिचित अशा अन्य देवांना अनुसरून त्यांची सेवा करण्याची गुप्तपणे फूस लावू लागला म


Lean sinn:

Sanasan


Sanasan