Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 2:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 तर आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा, ह्यासाठी की, तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे, आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

28 तर आता मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, ह्यासाठी की तो प्रकट होईल, तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापुढून लाजेने माघार घ्यावी लागू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 आता प्रिय मुलांनो, सतत त्यांच्यामध्ये राहा, म्हणजे ते प्रकट होतील त्यावेळी आपण आत्मविश्वासपूर्वक असावे आणि त्यांच्या येण्याच्या दिवशी त्यांच्यासमोर आपणास लज्जित व्हावे लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 2:28
29 Iomraidhean Croise  

त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;


पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलीया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन.


मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्या वेळी ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.’


मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे उभे असलेल्यांमध्ये काही असे आहेत की ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”


ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.”


मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल.


त्याप्रमाणे शास्त्रात लिहिले आहे, “पाहा, अडवणुकीचा धोंडा व अडखळण्याचा खडक मी सीयोनात ठेवतो; त्याच्यावर जो विश्वास ठेवील तो फजीत होणार नाही.”


असे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.


पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.


त्या प्रभूच्या ठायी आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत.


आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल2 तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.3


कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना?


ह्यासाठी की, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्या वेळेस त्याने तुमची अंत:करणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावीत.


शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.


आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक व निर्दोष राख.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल.


त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्‍यांदा दिसेल.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला गौरवाचा न कोमेजणारा हार2 प्राप्त होईल.


अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हांला लिहितो. जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे,


प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.


प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल, तर देवासमोर येण्यास आपल्याला धैर्य आहे.


न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे; कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत.


त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल;


‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan