Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 जरी आपल्यातूनच ते निघून गेले कारण ते आपले नव्हते. ते आपले असते, तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नव्हता, हे प्रकट व्हावे म्हणून ते निघून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 ते आपल्यामधूनच बाहेर पडले आहेत, परंतु ते खरोखर आपले नव्हतेच. कारण ते जर आपल्यातील असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते; परंतु ते गेल्याने हे सिद्ध झाले की त्यांच्यापैकी कोणीही आपल्यातील नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 2:19
30 Iomraidhean Croise  

तरी नीतिमान आपला मार्ग धरून राहील, निर्मळ हाताच्या मनुष्याला अधिकाधिक शक्ती प्राप्त होईल;


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उठतील व साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून मोठी ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’


खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.


माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो; आणि फळ देणार्‍या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो.


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”


आमच्यापैकी काहींनी जाऊन आपल्या बोलण्याने (म्हणजे सुंता करून घ्यावी व नियमशास्त्र पाळावे असे सांगून) तुम्हांला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करायला सांगितले नव्हते.


तुमच्यापैकीही काही माणसे उठून शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.


तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही; कारण इस्राएल वंशातले ते सर्व इस्राएल आहेत असे नाही.


कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.


तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हांला अपरिचित अशा ‘अन्य देवांची सेवा करायला या’ असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकवले,


ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो.


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


तरी हे अधिक सरसावणार नाहीत; कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.


परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.


कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan