Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 योहान 1:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जे आरंभापासून होते, ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हातांनी हाताळले त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, होय, जे आम्ही पाहिले आहे व ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही लिहीत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जे प्रारंभीपासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिले आहे, ज्याच्याकडे आम्ही लक्षपूर्वक पाहिले आहे आणि आमच्या हातांनी स्पर्श केला आहे; जीवनाच्या वचनासंबंधी आम्ही ही घोषणा करीत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 योहान 1:1
23 Iomraidhean Croise  

हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्‍यांनाही तो मीच आहे.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


ह्यांनी आम्हांला सांगून ठेवलेला वृत्तान्त लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे;


माझे हात व माझे पाय पाहा; मीच तो आहे; मला चाचपून पाहा; जसे मला हाडमांस असलेले पाहता तसे भुताला नसते.”


ज्याने हे पाहिले त्याने साक्ष दिली आहे, त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो हे त्याला ठाऊक आहे, ह्यासाठी की, तुम्हीही विश्वास ठेवावा.


नंतर त्याने थोमाला म्हटले, “तू आपले बोट इकडे कर. माझे हात पाहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.”


कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले;


येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे.”


मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ अचूक प्रमाणांनी आपण जिवंत आहोत हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.


कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हांला शक्य नाही.”


तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून, ते ऐकणार्‍यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले;


आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे.


[कारण की स्वर्गात साक्ष देणारे तिघे आहेत : पिता, शब्द आणि पवित्र आत्मा आणि हे तिघे एक आहेत.]


ती म्हणाली, “[मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ व शेवट आहे;] तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते [आशियातील] इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया व लावदिकीया येथील सात मंडळ्यांकडे पाठव.”


‘प्रभू देव जो आहे,’ जो होता व जो येणार, ‘जो सर्वसमर्थ,’ तो म्हणतो, “मी अल्फा व ओमेगा आहे.”2


रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणिदेवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते;


स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला लिही; जो पहिला व’ शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो :


Lean sinn:

Sanasan


Sanasan