Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांना ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यास, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 मात्र हे तुमचे स्वातंत्र्य दुर्बळास अडथळ्याचे कारण होऊ नये म्हणून जपा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 8:9
27 Iomraidhean Croise  

गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.


अशी वाणी झाली की, “भर घाला, भर घाला, मार्ग तयार करा; माझ्या लोकांच्या मार्गावरून ठेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका.”


“मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयांत आपल्या मूर्ती वागवल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवले आहे; अशा लोकांना मी आपल्याला प्रश्‍न विचारू देईन काय?


त्यांनी त्यांच्या मूर्तींपुढे इस्राएल घराण्याची सेवाचाकरी केली व ते त्यांना पापात पाडणारे अडथळे झाले, म्हणून मी त्यांच्यावर आपला हात उगारला आहे आणि ते आपल्या अधर्माचे प्रतिफळ भोगतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


बहिर्‍याला शिव्याशाप देऊ नकोस, किंवा ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नकोस, पण तू आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.


सांभाळा, ह्या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका; कारण मी तुम्हांला सांगतो, स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.


आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.


कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसर्‍याचेही पाहावे.


परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.]


येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची; कारण माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसर्‍याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा?


यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;


कारण सुज्ञ असा जो तू त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना?


बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.


दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्वकाही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.


स्वतःला हिणवून मी हे बोलतो; तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल, तिच्यात मीही धीट आहे (हे मी मूढपणाने बोलतो).


एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळवला गेला तर मला संताप येत नाही काय?


आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही;


बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा.


ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या;


दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.


ते त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात आणि स्वतः तर भ्रष्टतेचे दास आहेत; कारण मनुष्य ज्याच्या कह्यात जातो त्याचा तो दासही बनतो.


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan