Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 8:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही आणि एकाशिवाय दुसरा देव नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, जे खरोखर अस्तित्वात नाही त्याचे प्रतिनिधित्व मूर्ती करीत असते आणि एकाखेरीज दुसरा देव नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 8:4
33 Iomraidhean Croise  

कारण तू थोर व अद्भुत कृत्ये करणारा आहेस; तूच केवळ देव आहेस.


“सेनाधीश परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस, तूच आकाश व पृथ्वी निर्माण केलीस.


आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातांतून आम्हांला सोडव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राज्ये जाणतील की तूच काय तो परमेश्वर आहेस.”


पाहा, तुम्ही काहीच नाही, तुमच्या हातून काहीएक होणे नाही; तुमची निवड करणारा साक्षात अमंगळ होय.


तुझा उद्धारकर्ता, गर्भावस्थेपासून तुला घडणारा परमेश्वर म्हणतो, “मी वस्तुमात्राचा कर्ता परमेश्वर आहे; मी एकट्याने आकाश पसरले, पृथ्वीचा विस्तार केला तेव्हा माझ्याजवळ कोण होते?


इस्राएलाचा राजा परमेश्वर, त्याचा उद्धारकर्ता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो : “मी आदी आहे, मी अंत आहे; माझ्यावेगळा देव नाहीच.


परमेश्वर असे म्हणतो, “मिसराच्या श्रमाचे फळ, कूशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक तुझ्याजवळ येऊन तुझे होतील; ते तुझ्यामागून येतील; बेड्या घातलेले येतील, तुला दंडवत घालतील. ते तुला विनंती करून म्हणतील की : ‘खरोखर तुझ्याजवळ देव आहे, दुसरा कोणी नाही, दुसरा कोणीच देव नाही.”’


मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले,


तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


येशूने उत्तर दिले, सर्वांत पहिली ही की, ‘हे इस्राएला, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;’


“गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो.


तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा.


तुम्ही पाहता व ऐकता की, हातांनी केलेले देव हे देवच नाहीत असे ह्या पौलाने केवळ इफिसातच नव्हे तर बहुतेक सर्व आशिया प्रांतात बोलून व पुष्कळ लोकांच्या मनात भरवून त्यांना फितवले आहे.


आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी : “आपल्या सर्वांना ज्ञान आहे” हे आपल्याला ठाऊक आहे. “ज्ञान” फुगवते, प्रीती उन्नत्ती करते.


कारण सुज्ञ असा जो तू त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना?


ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो.


तथापि, पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता;


सर्वांवर आणि सर्वांमधून आणि तुम्हा सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे.


‘हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या दासाला आपला प्रताप व आपला समर्थ हात दाखवू लागला आहेस; तुझ्यासारखी कार्ये करणारा व पराक्रम करणारा देव स्वर्गात किंवा पृथ्वीवर कोण आहे?


‘आता पाहा, मी, मीच तो आहे, माझ्याशिवाय कोणी देव नाही; प्राणहरण व प्राणदान करणारा मीच आहे. मी घायाळ करतो आणि मीच बरे करतो; माझ्या हातून सोडवणारा कोणी नाही.


परमेश्वरच देव आहे व त्याच्याशिवाय दुसरा नाही असे तुला कळावे म्हणून हे तुला दाखवण्यात आले.


म्हणून आज हे समजून घ्या आणि ध्यानात ठेवा की, वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे, दुसरा कोणी नाही.


हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे;


जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.


कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे.


अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, (येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे) गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan