Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 7:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 7:5
11 Iomraidhean Croise  

त्याने लोकांना सांगितले की, तिसरा दिवस येईपर्यंत तयार असा, स्त्रीस्पर्श करू नका.


त्याने दुसरी बायको केली तरी हिला अन्नवस्त्र व वैवाहिक व्यवहार ह्यांत काही कमी पडू देऊ नये.


लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा; वडिलांना जमवा; मुले व स्तनपान करणारी अर्भके ह्यांनाही एकत्र करा; वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत.


आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे ह्यांना असे विचारण्यास पाठवले की, “आम्ही वर्षानुवर्ष करत आलो तसे पाचव्या महिन्यात एकान्ती बसून रुदन करावे काय?”


[तरीपण प्रार्थना व उपास ह्यांवाचून असल्या जातीचे भूत निघत नाही.] ”


तो त्यांना म्हणाला, “सर्व जण हे वचन स्वीकारू शकत नाहीत; पण ज्यांना हे दान दिले आहे तेच स्वीकारू शकतात.


तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.”’


पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे.


ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan