Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तीपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, समलिंगी, लैंगिक दृष्ट्या विकृत जन,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 अशा वाईट गोष्टी करणार्‍यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. व्यभिचारी, मूर्तिपूजक, जारकर्मी आणि पुमैथुनी,

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 6:9
51 Iomraidhean Croise  

ते लोटाला हाक मारून म्हणाले, “आज रात्री तुझ्याकडे आलेले पुरुष कोठे आहेत? त्यांना बाहेर आण, म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.”


खोटी अफवा उठवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.


खोट्या तागडीचा परमेश्वराला वीट आहे, पण खरे वजन त्याला प्रिय आहे.


जो दुष्कर्म पेरतो तो अनर्थाची कापणी करतो, त्याच्या क्रोधाचा सोटा व्यर्थ होईल.


तिचे घर म्हटले म्हणजे अधोलोकाकडे, मृत्यूच्या खोल्यांकडे, खाली उतरण्याचा मार्ग होय.


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


त्याने डोंगरावर भोजन केले, आपल्या शेजार्‍याची स्त्री भ्रष्ट केली,


तू आपल्या शेजार्‍याच्या बायकोशी गमन करून तिच्यासह अशुद्ध होऊ नकोस.


स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करू नकोस, हे अमंगळ कृत्य होय.


न्यायनिवाडा करताना अन्याय करू नकोस, गरिबाच्या गरिबीकडे पाहू नकोस आणि समर्थापुढे नमू नकोस; तर आपल्या शेजार्‍याचा न्याय निःस्पृहपणे कर.


कोणा पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते त्या दोघांचे अमंगळ कृत्य होय; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


तो मला म्हणाला, “ह्या सर्व देशाला प्राप्त होणारा शाप तो हा पट आहे; चोरी करणार्‍या सर्वांना ह्या लेखानुसार एका बाजूने घालवतील व खोटी शपथ वाहणार्‍या सर्वांना ह्या लेखानुसार दुसर्‍या बाजूने घालवतील.


आणखी ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला शंभरपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल;


तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या;


तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा; कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन ‘मीच तो आहे’ आणि ‘तो काळ जवळ आला आहे,’ असे म्हणतील; त्यांच्या नादी लागू नका.


आता बंधूंनो, मी तुम्हांला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो; तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हांला वतन देण्यास समर्थ आहे.


तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”


वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.


फसू नका, “कुसंगतीने नीती बिघडते.”


बंधुजनहो, मी असे म्हणतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.


तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्त हरण करणारे1 व मूर्तिपूजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल.


म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.


चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे1 ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.


तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही;


शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.


फसू नका; देवाचा उपहास व्हायचा नाही; कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.


एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे; अशा प्रकारे इस्राएलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणार्‍या प्रत्येकाचा वीट आहे.


इस्राएलकन्यांपैकी कोणीही वेश्या2 होऊ नये, आणि इस्राएलपुत्रांपैकी कोणालाही पुंमैथुनास वाहू नये.


तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;


सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


माझ्या प्रिय बंधूंनो, फसू नका;


मुलांनो, कोणी तुम्हांला बहकवू नये; जसा तो नीतिमान आहे तसा नीतीने चालणाराही नीतिमान आहे.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan