Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 6:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाडणूक करता, आणि ती बंधुजनांची करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 उलट तुम्ही दुसऱ्यावर आणि स्वतःच्या भावावर अन्याय करता आणि फसवता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 उलट तुम्ही स्वतः अन्याय व फसवणूक करता आणि तीही बंधुजनांची करता!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 उलट, तुम्ही स्वतःच बंधू व भगिनींची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय करता!

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 6:8
8 Iomraidhean Croise  

आपल्या शेजार्‍यावर जुलूम करू नकोस व त्याला लुबाडू नकोस. मजुराची मजुरी रात्रभर, दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नकोस.


ते शेतांचा लोभ धरून ती हरण करतात, घरांचा लोभ धरून ती हस्तगत करतात; असे ते माणसावर व त्याच्या घरावर, माणसावर व त्याच्या वतनावर बलात्कार करतात.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


तेव्हा त्याने त्यांतील एकाला उत्तर दिले, ‘गड्या, मी तुझ्यावर अन्याय करत नाही; तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही?


तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”’


कारण अन्याय करणार्‍याने केलेल्या अन्यायाबद्दल त्याला परत मिळेल; पक्षपात होत नाही.


कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते.


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan