Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तर आपण जुन्या खमिराने किंवा वाईटपणा व कुकर्माच्या खमिराने नाही, पण सरळपणा व खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 ह्यामुळे आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने म्हणजे अप्रामाणिकपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर प्रामाणिकपणा व सत्य ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आपण सण साजरा करू या, जुन्या भाकरीच्या खमिराने, द्वेष आणि दुष्टपणाने नव्हे तर त्याऐवजी प्रामाणिकपणाने व सत्याने अखमीर भाकरीने साजरा करू या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 5:8
34 Iomraidhean Croise  

ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!


लोकसमुदाय सण पाळीत असे तेव्हा त्यांच्या मेळ्याबरोबर मी कसा चाले; आणि आनंदोत्सव व देवस्तवन ह्यांचा गजर चालला असता देवाच्या घराकडे त्यांना मी कसा मिरवत नेई, हे आठवून माझ्या जिवाचे पाणी पाणी होते.


सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी; पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे; पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी खमिराची भाकर खाईल त्याचा इस्राएलातून उच्छेद करावा.


सात दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे; कारण एखादा खमिराचा पदार्थ जो कोणी खाईल, तो परदेशीय असो की स्वदेशीय असो, त्याचा इस्राएलाच्या मंडळीतून उच्छेद करावा.


आणि त्यांनी त्याच रात्री त्याचे मांस विस्तवावर भाजून बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावे.


सात दिवस बेखमीर भाकरी खाव्यात आणि सातव्या दिवशी परमेश्वरासाठी सण पाळावा.


ह्या सात दिवसांत बेखमीर भाकर खावी; खमिराची भाकर तुझ्याजवळ दिसता कामा नये, तुझ्या देशभर खमीर दिसूही नये.


सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करत आहे; उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.


सण पाळताना जसा रात्री गायनाचा नाद उठतो तसा तुमच्या गायनाचा नाद उठेल; परमेश्वराच्या पर्वताकडे, इस्राएलाच्या दुर्गाकडे बासरी वाजवत समारंभाने जाणार्‍याप्रमाणे तुमच्या मनास उल्लास प्राप्त होईल.


त्याच महिन्याच्या पंधराव्या दिवशी परमेश्वराप्रीत्यर्थ बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; त्यात तुम्ही सात दिवस बेखमीर भाकर खावी.


तेव्हा त्यांना समजले की, त्याने भाकरीच्या खमिराविषयी नाही तर परूशी व सदूकी ह्यांच्या शिकवणीविषयी सावध राहण्यास सांगितले.


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”


मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.”


इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले; तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, “तुम्ही आपणांस परूश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा.


नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”


कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?


आम्हांला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सदसद्विवेकबुद्धीची साक्ष ही आहे की, दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, आम्ही जगात व विशेषेकरून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्त्विकपणाने वागलो.


पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.


हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्‍यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो.


तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून तीनदा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवांचा सण ह्या तिन्ही सणांत तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्यासमोर हजर राहावे; पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये;


त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील.


तर आता परमेश्वराचे भय धरा, त्याची सेवा सात्त्विकतेने व खर्‍या मनाने करा आणि महानदीपलीकडे व मिसर देशात ज्या देवांची तुमच्या पूर्वजांनी सेवा केली ते टाकून देऊन परमेश्वराची सेवा करा.


ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan