Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हास त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? जे कोणी हे कर्म केले असेल त्यास तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तरीही तुम्ही अहंकार बाळगता! हे कर्म करणाऱ्याला आपणांतून घालवून देण्याइतका उद्वेग तुम्ही प्रकट केला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि तुम्ही अभिमान बाळगता! याउलट दुःखाने ज्या मनुष्याने असे केले, त्याला सहभागितेतून घालवून द्यावयाचे नव्हते का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 5:2
16 Iomraidhean Croise  

तू ही वचने ऐकून दीन झालास, आणि हे स्थान व ह्यातील रहिवासीही विस्मयाला व शापाला विषय होतील असे जे मी बोललो आहे ते ऐकून परमेश्वरापुढे नम्र झालास, तू आपली वस्त्रे फाडलीस व माझ्यासमोर रडलास ह्यामुळे मी तुझी विनंती ऐकली आहे, असे परमेश्वर म्हणतो.


लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत, म्हणून माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे प्रवाह वाहतात.


पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकान्ती शोकाकुल होईल; परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यांतून टपटप आसवे गळतील.


परमेश्वर त्याला म्हणाला, “नगरामधून, यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.”


वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया ह्यांची निखालस कत्तल करा; पण ज्यांच्यावर चिन्ह असेल त्यांना स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा.” तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला.


त्या वेळेस मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणली.


मी तुमच्याकडे येत नाही असे समजून कित्येक फुगले आहेत.


जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”


कारण मला भीती वाटते की, मी आल्यावर, जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हांला दिसून येईन; कदाचित भांडणतंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणेफुगणे, अव्यवस्था ही मला आढळून येतील.


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan