Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 5:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? ‘त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या’, असे धर्मशास्त्र सांगते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 बाहेरच्या लोकांचा न्याय करणारे परमेश्वर आहेत. “या दुष्ट मनुष्याला तुमच्यामधून काढून टाका.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 5:13
18 Iomraidhean Croise  

आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते; देव स्वतः न्याय करणारा आहे. (सेला)


युद्धशस्त्रांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे; एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो.


आणि जर त्याने त्यांचे ऐकले नाही तर मंडळीला कळव आणि जर त्याने मंडळीचेही ऐकले नाही तर तो तुला परराष्ट्रीय किंवा जकातदार ह्यांच्यासारखा होवो.


त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे.”


ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही.


तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.


त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणार्‍याला जिवे मारावे; कारण तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले व दास्यगृहातून सोडवले, त्या तुमच्या परमेश्वर देवाने नेमून दिलेला मार्ग तुम्ही सोडावा म्हणून तो तुम्हांला फितवतो. अशा प्रकारे तुम्ही आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


जो मनुष्य उन्मत्त होऊन तुझा देव परमेश्वर ह्याच्या सेवेस तेथे उपस्थित असणार्‍या याजकाचे किंवा न्यायाधीशाचे ऐकणार नाही तो मनुष्य प्राणास मुकावा; अशा प्रकारे इस्राएलातून तू ही दुष्टाई नाहीशी करावीस.


ज्याला जिवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदाराचे हात पडावेत आणि मग इतर लोकांचे हात पडावेत. अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावेस.


मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.


तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा म तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजार्‍याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला; ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.


गिब्यातील त्या बदमाशांना आमच्या हवाली करा म्हणजे आम्ही त्यांना ठार मारून इस्राएलातून ही दुष्टाई काढून टाकू.” पण बन्यामिनी लोक आपले भाऊबंद इस्राएल लोक ह्यांचे म्हणणे ऐकायला तयार होईनात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan