Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मी अशी बातमी ऐकली आहे की, तुमच्यामध्ये व्यभिचार चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य परराष्ट्रीय लोकांमध्येही आढळणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की, जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही. म्हणजे तुमच्यामधील एकाचे स्वतःच्या सावत्र आईबरोबर अनैतिक संबंध आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मला असा अहवाल मिळाला आहे की तुमच्यामध्ये लैंगिक अनैतिकता आहे, की जी गैरयहूदीही खपवून घेणार नाहीत; कोणाएका मनुष्याने आपल्या वडिलांच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 5:1
32 Iomraidhean Croise  

इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


याकोब वंशाचा वृत्तान्त1 हा : योसेफ सतरा वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली.


तथापि तू पाण्यासारखा चंचल असल्यामुळे तुला श्रेष्ठत्व मिळायचे नाही; कारण तू आपल्या बापाच्या खाटेवर चढलास, तू ती भ्रष्ट केलीस. तो माझ्या शय्येवर चढला.


अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्राएलांदेखत अबशालोम आपल्या पित्याच्या उपपत्नींपाशी गेला.


दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या दहा उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या त्यांना त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली; पण त्याने त्यांच्याशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्यदशेत तशाच अटकेत राहिल्या.


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी : रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही;


तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.


तू त्यांच्या मार्गांनी व त्यांच्या अमंगळ कृत्यांप्रमाणे थोडीथोडकी चाललीस असे नाही, तर तू आपला सर्व आचार त्यांच्यापेक्षाही भ्रष्ट केलास.


तुझ्यात ते बापाची काया उघडी करतात, रजस्वला स्त्री दूर बसली असता तिच्याबरोबर गमन करतात.


आपल्या सावत्र आईची कायाही उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाचीच काया होय.


जो आपल्या पित्याच्या बायकोशी गमन करतो तो आपल्या पित्याची काया उघडी करतो; त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.


तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा.


त्या म्हणजे मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावीत; ह्यांपासून स्वत:ला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.”


कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे.


म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.


“अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे;” पण त्या दोहोंचाही अंत देव करील. पण शरीर जारकर्मासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे; आणि शरीरासाठी प्रभू आहे.


जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते; परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.


अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,


मला भीती वाटते की, मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुमच्यापुढे खाली पाहायला लावील; आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातुरपणाचा पश्‍चात्ताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल.


कोणी दु:ख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी — फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर — तुम्हा सर्वांना दिले.


तथापि मी तुम्हांला लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे, आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हांला देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले.


देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा,


परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये.


कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये; आपल्या बापाची बेअब्रू करू नये.


‘जो आपल्या सावत्र आईशी गमन करतो तो आपल्या बापाची बेअब्रू करतो म्हणून तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा;


कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.


तिने पश्‍चात्ताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जारकर्माबद्दल पश्‍चात्ताप करण्याची तिची इच्छा नाही.


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


माझ्या मुलांनो, असे करू नका; माझ्या कानावर जो बोभाटा येत आहे तो काही ठीक नाही; तुम्ही परमेश्वराच्या प्रजेकडून पातक करवत आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan