Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत; आम्ही ठोसे खात आहोत, आम्हांला घरदार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले व उघडेवाघडे आहोत. आम्हांला मारहाण होते, आम्हांला घरदार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 या घटकेपर्यंत आम्ही भुकेले व तहानलेले, घाणेरडी वस्त्रे घातलेले व अतिशय कठोर वागणूक मिळालेले व बेघर असे आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 4:11
13 Iomraidhean Croise  

तू विनाकारण आपल्या बंधूचे गहाण अडकवून ठेवलेस; उघड्यानागड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतलीस.


येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातील पाखरांना कोटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकण्यास ठिकाण नाही.”


नंतर अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहूदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले.


मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला.


तेव्हा प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्याजवळ उभे राहणार्‍यांना त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली.


ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करतील काय?


आम्हांला खाण्यापिण्याचा हक्क नाही काय?


कारण कोणी तुम्हांला गुलामगिरीत लोटले, तुम्हांला खाऊन टाकले, तुम्हांला अंकित केले, स्वत:ला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले, तर ते सगळे तुम्ही सहन करता.


आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही;


दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे.


मला अंत्युखियात, इकुन्यात व लुस्त्रात जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तू ओळखून आहेस; त्या सर्वांतून प्रभूने मला सोडवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan