Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 3:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 तुम्ही अजूनही ऐहिक लोकांसारखे आहात. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी प्रवृत्तीने चालता की नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 3:3
17 Iomraidhean Croise  

त्यांनी मनुष्याप्रमाणे1 करार मोडला आहे; तेथे ते माझ्याबरोबर बेइमानपणे वागले आहेत.


दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे.


कारण प्रथम हे की, तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो;


कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे;” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे;” तेव्हा तुम्ही (दैहिक) मानवच आहात की नाही?


कारण मला भीती वाटते की, मी आल्यावर, जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हांला दिसून येईन; कदाचित भांडणतंटे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसणेफुगणे, अव्यवस्था ही मला आढळून येतील.


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.


कारण आपणही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासांचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यांत आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो;


कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.


ह्यासाठी की, तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan