Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 3:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तर बांधणार्‍या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 आणि बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, ख्रिस्ताचा दिवस ते उघडकीस आणील, कारण तो दिवस अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे, ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तर त्या प्रत्येकाचे काम जसे आहे तसे दिसेल, कारण तो दिवस ते प्रकाशात आणेल. अग्नीद्वारे ते प्रकट होईल, प्रत्येकाचे काम कसे आहे हे अग्नीने पारखले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 3:13
28 Iomraidhean Croise  

न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”


नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्‍चये प्रभातसमय नाही.


कोणा संदेष्ट्याने स्वप्न पाहिले असेल तर ते तो कथन करो; माझे वचन कोणाजवळ असेल तर सत्याला स्मरून तो ते माझे वचन सांगो. गव्हापुढे पेंढा तो काय? असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वर म्हणतो, माझे वचन अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय?


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधी होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणार्‍या पुत्रावर दया करतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.


त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;


मी तुम्हांला खचीत सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल.


मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्या वेळी ‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल.’


ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)”


ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील.


ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो,


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


ह्या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही. कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे, त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरवसा आहे.


(प्रभू करो आणि त्या दिवशी त्याला प्रभूपासून दया मिळो!) आणि इफिसात कितीतरी प्रकारे त्याने सेवा केली हे तुला चांगले माहीत आहे.


तरी हे अधिक सरसावणार नाहीत; कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.


आता जे राहिले ते हेच की, माझ्यासाठी नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे; प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल; आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल.


आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


पण आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.


मग मृत झालेल्या लहानथोरांना मी [देवाच्या] राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्या वेळी ‘पुस्तके उघडली गेली;’ तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan