Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 जो आध्यात्मिक नाही तो देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्या त्याला समजू शकत नाहीत; कारण त्यांची पारख आध्यात्मिक दृष्टीने होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु जो मनुष्य आत्मिक नाही, तो परमेश्वराच्या आत्म्यापासून आलेल्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्याला त्या मूर्खपणाच्या वाटतात, त्याला त्या समजणार नाहीत, कारण त्या गोष्टी परमेश्वराच्या आत्म्यानेच पारखल्या जाऊ शकतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 2:14
36 Iomraidhean Croise  

निंदक ज्ञानाचा शोध करतो, पण व्यर्थ; समंजसाला ज्ञानप्राप्ती होणे सोपे असते.


परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे.”


त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, “त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे; त्याचे तुम्ही का ऐकता?”


त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;


जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील.


तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.


परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल;


जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?


तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही.


तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती; ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे; ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले; तिचे अंत:करण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले.


तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्यापैकी कित्येक तत्त्वज्ञान्यांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, “हा बडबड्या काय बोलतो?” दुसरे म्हणाले, “हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो;” कारण येशू व पुनरुत्थान ह्यांविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करत असे.


तेव्हा मृतांच्या पुनरुत्थानाविषयी ऐकून कित्येक थट्टा करू लागले. कित्येक म्हणाले, “ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.”


परंतु हा वाद शब्दांचा, नावांचा किंवा तुमच्या नियमशास्त्राचा आहे तर तुमचे तुम्हीच पाहून घ्या; ह्या गोष्टींची पंचाईत मला नको.”


केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो असा कोणी मृत झालेला येशू, ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता.


कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.


कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्‍या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले.


आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,


कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.


प्राणमय1 शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे.


तथापि जे आध्यात्मिक ते प्रथम नाही; प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते.


आपल्याला जगाचा आत्मा नव्हे, तर देवापासून निघणारा आत्मात्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.


बंधुजनहो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्याबरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दैहिकांबरोबर, जसे ख्रिस्तातील बालकांबरोबर, तसे मला बोलावे लागले.


हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे.


जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.


तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.


आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे, आणि जो सत्य आहे त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहोत. हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे.


ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांना पवित्र आत्मा नाही अशी आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan