Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 16:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 पण कदाचित तुमच्याजवळ राहीन व हिवाळाही घालवीन; अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 आणि शक्य झाल्यास मी तुमच्याबरोबर राहीन आणि हिवाळाही घालवीन, म्हणजे मी जाणार असेन तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 कदाचित मी तुमच्याजवळ राहीन, कदाचित हिवाळाही घालवीन, अशा हेतूने की, मला जायचे असेल तिकडे जाण्यासाठी तुम्ही मला साहाय्य करू शकाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तेव्हा मी तुमच्याबरोबर बहुतेककरून अधिक काळ, कदाचित हिवाळादेखील घालवेन. मग मी जिथे कुठे जाईन, तिथे माझी रवानगी करण्यात मला तुम्ही मदत करू शकता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 16:6
11 Iomraidhean Croise  

मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.


तेव्हा पौलाला पोहचवणार्‍यांनी त्याला अथेनैपर्यंत नेले, आणि सीला व तीमथ्य ह्यांनी आपल्याकडे होईल तितक्या लवकर यावे अशी त्यांची आज्ञा घेऊन ते निघाले.


‘माझे तोंड तुमच्या दृष्टीस ह्यापुढे पडणार नाही,’ असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दु:ख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहचवले.


मग असे झाले की, ते दिवस संपल्यावर आम्ही तेथून निघून मार्गस्थ झालो; तेव्हा स्त्रिया व मुले ह्यांच्यासह सर्वांनी आम्हांला नगराबाहेर पोहचवले. तेथे समुद्राच्या किनार्‍यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली.


ते बंदर हिवाळ्यात राहायला सोईचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की, तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फेनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा; हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे.


ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियाचे दयस्कुरै2 ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरता त्या बेटाजवळ राहिले होते, त्यात बसून आम्ही निघालो.


म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन (कारण तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो.)


म्हणून कोणी त्याला तुच्छ मानू नये; तर त्याने माझ्याकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा; कारण बंधुजनांसह त्याच्या येण्याची मी वाट पाहत आहे.


तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे, आणि तुम्ही मला यहूदीयाकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता.


मी अर्तमाला किंवा तुखिकाला तुझ्याकडे पाठवल्यावर होईल तितके करून माझ्याकडे निकपलिसास निघून ये, कारण तेथे हिवाळा घालवण्याचे मी ठरवले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan