Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुमच्यामधील प्रत्येकाने, त्यास यश मिळेल त्या मानाने, प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी द्रव्य जमवून ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल, त्या मानाने आपणाजवळ प्रत्येक रविवारी द्रव्य जमा करून ठेवावे, अशा हेतूने की, मी येईन तेव्हा ते गोळा केले जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 प्रत्येक आठवड्याच्या पहिल्या दिवशी, तुम्हातील प्रत्येकाने मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम बाजूला काढून, साठवून ठेवावी, म्हणजे मी तिथे आल्यानंतर वर्गण्या गोळा कराव्या लागणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 16:2
22 Iomraidhean Croise  

इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले;


तेव्हा लाबान त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असल्यास राहायचे कर; तुझ्यामुळे परमेश्वराने माझे अभीष्ट केले आहे हे मला शकुन पाहून कळले आहे.”


मी येण्यापूर्वी आपल्याजवळ थोडे होते, ते आता बहुतपट वाढले आहे; जेथे माझा पाय लागला तेथे परमेश्वराने आपले कल्याण केले आहे; तर आता मी स्वत:च्या घरादाराचे केव्हा पाहू?”


तू करुणा व सत्यता दाखवून आपल्या दासासाठी जे काही केले आहेस त्याला मी पात्र नाही. मी फक्त आपली काठी घेऊन ही यार्देन उतरून गेलो होतो, आणि आता माझ्या दोन टोळ्या झाल्या आहेत.


तर आपल्यासाठी आणलेली ही माझी भेट घ्याच; कारण देवाने माझ्यावर कृपादृष्टी केल्यामुळे मला सर्वकाही आहे.” याकोबाने त्याला आग्रह केल्यावर त्याने ती भेट घेतली.


तेव्हा सादोक घराण्यातला अजर्‍या मुख्य याजक त्याला म्हणाला, “लोक परमेश्वराच्या मंदिरात अर्पणे आणू लागले तेव्हापासून आम्हांला पोटभर खायला मिळून पुष्कळ शिल्लकही राहते; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे कल्याण केले आहे; जे शिल्लक राहिले आहे त्याची ही मोठी रास आहे.”


हिला जे काही करता आले ते हिने केले आहे. हिने उत्तरकार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधद्रव्य लावले आहे.


जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.


मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस, आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या.


त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”


मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”


मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.


ह्याविषयी मी आपले मत सांगतो; कारण हे तुम्हांला हितकारक आहे; तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे, तर अशी इच्छा करण्यासही केला.


पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे.


प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan