Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 16:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 अशांना, आणि जो कोणी सेवेत साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 प्रत्येकजण जो या कार्यात सामील होतो व प्रभूसाठी श्रम करतो अशा लोकांच्या तुम्हीसुद्धा अधीन व्हा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 अशा लोकांना आणि जो कोणी सेवाकार्यात साहाय्य करतो व श्रम करतो त्याला, तुम्ही मान्यता द्यावी अशी मी तुम्हांला विनंती करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 की जे कोणी साहाय्य आणि श्रम करतात अशा लोकांच्या स्वाधीन राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 16:16
20 Iomraidhean Croise  

मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.


ह्या भूतलावर2 मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यांत त्याला काय लाभ?


प्रभूमध्ये श्रम करणार्‍या त्रुफैना व त्रुफासा ह्यांना सलाम सांगा. प्रिय पर्सिस हिला सलाम सांगा. तिने प्रभूमध्ये फार श्रम केले.


ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा;


मरीयेला सलाम सांगा; तिने तुमच्यासाठी फार श्रम केले आहेत.


ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखु ह्यांना सलाम सांगा.


तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत.


कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.


ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा.


आणि तसेच हे माझ्या खर्‍या सोबत्या, मी तुलाही विनवतो की, ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर, आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर.


आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो.


बंधूंनो, आमचे श्रम व कष्ट ह्यांची आठवण तुम्हांला आहे; तुमच्यातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रं-दिवस कामधंदा करून तुमच्यापुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली.


बंधुजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये तुमच्यावर असतात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा;


जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेषेकरून जे उपदेश व शिक्षण ह्या बाबतींत श्रम घेतात ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावेत.


आपल्या अधिकार्‍यांच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यायचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करतात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.


तुम्ही आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात.


कारण तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.


तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan