Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,3 शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांसाठी मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मला जे मिळाले, ते मी अत्यंत महत्त्वाचे समजून तुमच्या सुपूर्त केले, म्हणजेच पवित्र शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांसाठी मरण पावला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 15:3
38 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


“मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांना बजावून सांग.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.”


हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे.


मग तो त्यांना म्हणाला, “अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो!


दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!


तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला.


परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले.


तो जो शास्त्रलेख वाचत होता तो असा : “त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले; आणि जसे कोकरू कातरणार्‍याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही.


त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्‍चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. ह्यासाठी की, पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्त्व व्यक्त करावे;


तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.


तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो.


कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली;


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही, आणि ती मला कोणी शिकवलीही नाही; तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.


आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या-आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले.


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरता नेमलेला असतो, ह्यासाठी की, त्याने दाने व पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावीत.


आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे.


त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दु:खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या; त्यांत त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


Lean sinn:

Sanasan


Sanasan