Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 14:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला देवाचा संदेश सांगता यावा अशी उत्कंठा बाळगा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 प्रीतीचा मार्ग अनुसरा, तरीपण आत्म्याच्या देणग्यांची इच्छा बाळगत राहा, विशेषतः संदेश सांगण्याचे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 14:1
29 Iomraidhean Croise  

दुर्जनाचा मार्ग परमेश्वराला वीट आणतो, पण जो नीतीला अनुसरतो तो त्याला प्रिय आहे.


जो नीतिमत्ता व दया ह्यांना अनुसरून वर्ततो, त्याला जीवन, नीतिमत्ता व सन्मान प्राप्त होतात.


“तुम्ही जे नीतिमत्तेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका; ज्या खडकातून तुम्हांला खोदून काढले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हांला खणून काढले त्याकडे लक्ष द्या.


आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;


तर मग शांतीला व परस्परांच्या वृद्धीला पोषक होणार्‍या गोष्टी ह्यांच्यामागे आपण लागावे.


तर मग आपण काय म्हणावे? असे की, जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना नीतिमत्त्व म्हणजे विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्त्व प्राप्त झाले.


बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हांला दाखवतो.


सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.


मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.


म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणार्‍यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणार्‍यांसाठी चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणार्‍यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणार्‍यांसाठी आहे.


जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे.


म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.


तुम्ही जे काही करता ते सर्व प्रीतीने करा.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


संदेशांचा धिक्कार करू नका;


तुझ्यावर वडीलवर्ग2 हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ, आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग.


तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.


सर्वांबरोबर ‘शांततेने राहण्याचा’ व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा ‘झटून प्रयत्न करा.’


सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला;


प्रिय बंधो, वाइटाचे अनुकरण करू नको, तर चांगल्याचे कर. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणार्‍याने देवाला पाहिलेले नाही.


मग तू देवाच्या टेकडीजवळ पोहचशील, तेथे पलिष्ट्यांचा चौकीपहारा आहे; तू तेथे नगराजवळ पोहचल्यावर संदेष्ट्यांचा एक समुदाय उच्च स्थानाहून उतरून येताना तुला भेटेल, त्यांच्यापुढे सतार, डफ, सनई व वीणा वाजत असतील; व ते भाषण करीत असतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan