Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 13:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 प्रीती शाश्वत स्वरूपाची आहे. परंतु संदेश असले, तरी ते कालबाह्य होतील. अपरिचित भाषांची कृपादाने असली, तरी त्यांना अंत आहे आणि विद्या असली, तरी ती संपुष्टात येईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 भविष्यनिवेदन करण्याचे दान समाप्त होईल, वेगवेगळी भाषा बोलण्याचे दान स्तब्ध होईल आणि बुद्धीचे ज्ञान नाहीसे होईल; परंतु प्रीती अखंडपणे टिकून राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 13:8
14 Iomraidhean Croise  

अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे; आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर.”


अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.


आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.


तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.


एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते;


पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल.


सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.


म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.


जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही.


ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुंता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.


त्याने ‘नवा’ असे म्हटल्यावर पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे; आणि जे जुने व जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan