Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 मी माझे सर्व धन जरी अन्नदानार्थ दिले व माझे शरीर जाळण्यासाठी दिले आणि माझ्यामध्ये प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 माझ्याजवळ जी संपत्ती आहे ती सर्व मी गरिबांना दिली आणि माझे शरीर कष्ट सहन करण्यासाठी अर्पण केले, परंतु माझ्याठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 13:3
22 Iomraidhean Croise  

तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही.


पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता.


आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;


हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.”


तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.”


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला.


पेत्र त्याला म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? आपल्यासाठी मी माझा प्राण देईन.”


आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.


आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही; मी जी वचने तुम्हांला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत.


तेव्हा पौलाने उत्तर दिले, “तुम्ही रडून माझे मन खचवता, हे काय? मी नुसता बंधनात पडायलाच नाही, तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेमेत मरायलादेखील तयार आहे.”


आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.


विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका; कारण ज्यांकडून आचरणार्‍यांना लाभ नाही अशा खाद्यपदार्थांनी नव्हे, तर कृपेने अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan