Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 संदेश देण्याचे कृपादान जरी मला लाभलेले असले, सर्व रहस्ये व सर्व विद्या मला अवगत असल्या आणि डोंगर ढळवता येतील इतका माझा विश्वास दृढ असला आणि माझ्या मध्ये प्रीती नसली, तर मी शून्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मला परमेश्वराचे संकल्पनिवेदन करण्याचे दान असले, सर्वप्रकारच्या रहस्यांचे गहन अर्थ आकलन होत असले आणि सर्व ज्ञान असले आणि जरी डोंगर हालविण्याइतका मजजवळ विश्वास असला, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 13:2
38 Iomraidhean Croise  

त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.


तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे; कारण मी तुम्हांला खचीत सांगतो की, जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल; तुम्हांला काहीच असाध्य होणार नाही.


आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले.


येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल.


अंत्युखियाच्या मंडळीत बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते.


बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत;


बंधुजनहो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करायला समर्थ आहात अशी तुमच्याविषयी माझी स्वतःचीही खातरी झाली आहे.


आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्याच्या प्रकटीकरणाला अनुसरूनच माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हांला स्थिर करण्यास समर्थ असा जो एकच ज्ञानी देव, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.


जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो;


तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे; प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे,2 भिन्नभिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत.


मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.


मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही.


प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.


संदेश देणार्‍या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, आणि इतरांनी निर्णय करावा;


म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.


अन्य भाषा बोलणारा स्वत:चीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो.


पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;


जर कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रीती करत नसेल, तर तो शापभ्रष्ट असो. माराना था.1


आम्ही ख्रिस्ताचे सेवक व देवाच्या रहस्याचे कारभारी आहोत असे प्रत्येकाने आम्हांला मानावे.


सुंता होणे काही नाही व सुंता न होणेही काही नाही; तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच सर्वकाही आहे.


आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.”


मी मूढ बनलो! असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडले; माझी शिफारस तुम्ही करायची होती; कारण जरी मी काही नसलो तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा मी किंचितही उणा नव्हतो.


मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने1 चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही.


आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो.


ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हांला समजेल.


माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.


जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan