Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ही सर्व कृपादाने देणारा व कार्ये करून घेणारा पवित्र आत्मा एकच आहे; तो आपल्या इच्छेप्रमाणे ती एकेकाला वाटून देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ही सर्व कार्ये एक आणि एकच आत्मा करतो आणि आपल्या निर्धारानुसार प्रत्येकाला वाटून देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 12:11
18 Iomraidhean Croise  

पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले.


जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करण्यास मुखत्यार नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यांत सलते काय?’


योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.


वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.”


कारण जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो.


आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;


ह्यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो ‘कठीण हृदयाचे करतो.’


तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे.


कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे;


आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे.


तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे; आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांना नियम लावून देतो.


पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्‍याला दुसर्‍या प्रकारचे.


आम्ही प्रतिष्ठा मिरवली तर ती आपल्या मर्यादेबाहेर न मिरवता देवाने आम्हांला लावून दिलेल्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहचली आहे.


आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत;


तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे.


त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली.


आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपल्याला सत्यवचनाने1 जन्म दिला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan