Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 अद्भुत कार्य करणे, संदेश देणे, आत्मे ओळखणे, अपरिचित भाषा बोलणे, निरनिराळ्या अपरिचित भाषांचा अर्थ सांगणे ही कृपादाने एकेकाला दिली जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तोच आत्मा काही जणांना चमत्कार करण्याचे सामर्थ्य देतो, तर इतर काही जणांना संकल्प सांगण्याचे, तर कित्येकांना आत्मे ओळखण्याचे सामर्थ्य देतो. आणखी काहींना तो अन्य भाषा बोलण्याचे ज्ञान देतो; आणि त्याचप्रमाणे इतरांना अन्य भाषेचे स्पष्टीकरण करण्याची क्षमता देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 12:10
38 Iomraidhean Croise  

ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.


आणि विश्वास धरणार्‍यांबरोबर ही चिन्हे असत जातील : ते माझ्या नावाने भुते काढतील, नवनव्या भाषा बोलतील,


त्यानंतर त्यांनी तेथून निघून जाऊन सर्वत्र घोषणा केली. प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत होता व घडणार्‍या चिन्हांच्या द्वारे वचनाचे समर्थन करत होता.]


पाहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुमच्याकडे पाठवतो; तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरुशलेम शहरात राहा.”


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.


तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणार्‍या गोष्टी तुम्हांला कळवील.


परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.”


त्या दिवसांत यरुशलेमेहून अंत्युखियास संदेष्टे आले.


तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला.


आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला; ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.


तेव्हा पेत्र म्हणाला, “हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरवले आहे?


आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;


जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो;


प्रीती कधी अंतर देत नाही; संदेश असले तरी ते संपतील. भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील; आणि विद्या असली तरी ती संपेल.


अन्य भाषा बोलणार्‍याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी.


म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका.


जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून?


संदेशांचा धिक्कार करू नका;


त्यांच्याबरोबर देवानेही चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याची दाने वाटून देऊन साक्ष दिली.


प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.


‘तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत; तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केलीस; आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan