Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 10:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; कारण “लोक खायलाप्यायला बसले, नंतर नाचतमाशा करायला उठले” असे शास्त्रात लिहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यांच्यापैकी काहीजण मूर्तीपुजक होते तसे होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते मूर्तीसमोर शरीरासंबंधाच्या हेतूने नाच करण्यासाठी उठले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. ‘लोक खायला प्यायला बसले, नंतर धुंद होऊन लैंगिक गैरवर्तन करायला उठले’, असे धर्मशास्त्रात लिहिलेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 10:7
14 Iomraidhean Croise  

यहोशवाने लोकांचा गलबला ऐकला तेव्हा तो मोशेला म्हणाला, “छावणीत लढाईचा आवाज ऐकू येत आहे.”


मोशे छावणीजवळ येऊन पोहचल्यावर ते वासरू व नाचतमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातांतल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या.


त्याने ती त्यांच्या हातून घेऊन त्यांचे एक वासरू ओतून त्याला कोरणीने कोरले; तेव्हा ते म्हणू लागले की, “हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले आहे तेच हे तुझे देव.”


तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा.


म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.


अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हांला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे,


तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; तर कित्येकांवर मूर्तिपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य म्हणून खातात; तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते.


तेव्हा परमेश्वर मला म्हणाला, ‘ऊठ, येथून लवकर खाली जा; कारण ज्या तुझ्या लोकांना तू मिसर देशातून काढून आणलेस ते बिघडले आहेत, आणि ज्या मार्गाने जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो एवढ्यातच सोडून ते बहकून गेले आहेत; त्यांनी स्वतःसाठी एक ओतीव मूर्ती केली आहे.’


मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तींपासून दूर राखा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan