Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 10:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बंधूनो, तुम्हास हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 बंधुजनहो, आपले पूर्वज मेघाखाली होते आणि तांबड्या समुद्रातून ते सर्व पार गेले, ह्याची आपण आठवण ठेवावी, अशी माझी इच्छा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बंधू व भगिनींनो, आपल्या पूर्वजांनी मेघाखाली कूच केली. ते सर्वजण समुद्रातूनही पार गेले, याबद्दल आपण अज्ञानी असू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 10:1
29 Iomraidhean Croise  

तथापि तू अति दयाळू असल्याकारणाने त्यांना तू रानात सोडून दिले नाहीस; दिवसा त्यांचा मार्गदर्शक मेघस्तंभ त्यांच्यावरून ढळला नाही आणि रात्रीचा प्रकाश देऊन नीट मार्ग दाखवणारा अग्निस्तंभही ढळला नाही.


त्यांच्यावर छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरला, आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला.


त्याने समुद्राची कोरडी भूमी केली; ते नदीतून पायी पार गेले, तेव्हा आम्ही त्याच्या ठायी हर्ष पावलो.


त्याने त्यांना सुखरूप नेले, ते भ्याले नाहीत, त्यांच्या शत्रूंना तर समुद्राने बुडवून टाकले.


पण इस्राएल लोक भरसमुद्रात कोरड्या जमिनीवरून चालून गेले; आणि उजवीकडील व डावीकडील पाणी त्यांच्यासाठी भिंतीसारखे झाले.


मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.


आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील. ह्यांनी ऐकले आहे की, तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस; तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस.


मग ते पी-हहीरोथाहून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि एथाम रानात तीन दिवसांची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला.


आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.”


बंधुजनहो, इतर परराष्ट्रीयांमध्ये मला जशी फलप्राप्ती झाली तशी तुमच्यामध्येही व्हावी म्हणून तुमच्याकडे येण्याचा मी पुष्कळदा बेत केला (पण आतापर्यंत मला अडथळे आले), ह्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही.


आणि तो ‘सुंता न झालेला असताना’ त्याच्या ठायी असलेल्या विश्वासामुळे जे नीतिमत्त्व प्राप्त होते, त्याचा शिक्का म्हणून ‘सुंता ही खूण’ त्याला मिळाली; ह्यासाठी की, जे लोक सुंता न झालेले असता आपल्याकडे नीतिमत्त्व गणले जावे म्हणून विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे.


बंधुजनहो, तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही.


कोणी तसे समजत नसल्यास न समजो.


आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनानुसार वारस आहात.


तुमच्यासाठी वाटेत तळ देण्याचे ठिकाण शोधण्यास आणि रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन, ज्या वाटेने तुम्ही जायचे ती वाट तुम्हांला दाखवण्यास तो तुमच्यापुढे चालला.


जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले.


आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तो आटवून कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर ह्याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan