Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तर बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तर आता बंधूनो, देवाने तुम्हास केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे, सामर्थ्यशाली, उच्च कुळातले नव्हते,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 तर बंधुजनहो, तुम्हांला झालेल्या पाचारणाचा विचार करा. तुमच्यामध्ये पुष्कळ जण जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्यावेळी तुम्हाला पाचारण करण्यात आले त्यावेळी तुम्ही कोण होता याचा विचार करा. तुम्ही अनेकजण तर मनुष्यांच्या दृष्टीने शहाणे; किंवा प्रभावी किंवा कुलीन कुळात जन्मलेले नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 1:26
24 Iomraidhean Croise  

कोणीएकाने जाऊन आपल्या धन्याला सांगितले की ती इस्राएल मुलगी असे असे म्हणत आहे.”


म्हणून माणसे त्याचे भय धरतात; जे शहाणपणाचा अभिमान वाहतात, त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही.”


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात;


त्याच घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले.


तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्‍चर्य करून विश्वास ठेवला.


तो तेथील सुभेदार सिर्ग्य पौल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्णबा व शौल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शवली.


तरी काही माणसांनी त्याला चिकटून राहून विश्वास ठेवला; त्यांत दिओनुस्य अरीयपगकर, दामारी नावाची कोणी स्त्री व त्यांच्याबरोबर इतर कित्येक होते.


कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही.


‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?


ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवत्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.


ते ह्या युगातल्या अधिकार्‍यांतील कोणालाहळले नव्हते; कारण त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते;


सर्व पवित्र जन व विशेषेकरून कैसराच्या घरचे तुम्हांला सलाम सांगतात.


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


निवडलेली बाई1 व तिची मुले ह्यांना, वडील2 ह्यांच्याकडून : जे सत्य आपल्या ठायी आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करतो; आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan