Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 करिंथ येथील परमेश्वराच्या मंडळीस, जे ख्रिस्त येशूंमध्ये पवित्र केलेले व पवित्र होण्यासाठी बोलाविलेले, तसेच ख्रिस्त येशू आपले व त्यांचे प्रभू यांचे नाव घेऊन प्रत्येक ठिकाणी धावा करतात त्या सर्वांस:

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 1:2
45 Iomraidhean Croise  

मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्‍चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.


शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.


म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल; तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.


येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे.


त्याने त्यांची अंत:करणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.


त्यानंतर तो अथेनै सोडून करिंथास गेला.


तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेस, आणि त्यांना पापांची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.’


तेव्हा हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे;


आणि येथेही तुझे नाव घेणार्‍या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे.”


तेव्हा सर्व ऐकणारे विस्मित होऊन म्हणू लागले, “हे नाव घेणार्‍यांचा ज्याने यरुशलेमेत नाश केला तोच हा नव्हे काय? आणि त्यांना बांधून मुख्य याजकांकडे न्यावे म्हणूनच हा येथे आला होता ना?”


त्या तुम्हांला देव जो आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून कृपा व शांती असो.


यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करतात त्या सर्वांना पुरवण्याइतका तो संपन्न आहे.


हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही.


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;


यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका;


तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरीत्या त्याचे अवयव आहात.


तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.


करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासह संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तीमथ्य ह्यांच्याकडून :


कारण आम्ही आपली घोषणा करत नाही; तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूप्रीत्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो.


अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,


देवपित्याच्या ठायी व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी असलेली थेस्सलनीकाकरांची मंडळी हिला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.


कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.


देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्या ठायी असलेल्या थेस्सलनीकाकरांच्या मंडळीला पौल, सिल्वान व तीमथ्य ह्यांच्याकडून :


प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.


तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी जिवंत देवाची मंडळी आहे तिच्यात म्हणजे देवाच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.


त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती;


तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो, त्यावर हा शिक्का मारलेला आहे : “प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”


तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.


त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.


म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले.


कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत, ह्या कारणास्तव त्यांना ‘बंधू’ म्हणायची त्याला लाज वाटत नाही.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan