Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ करिंथ 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 “कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन आणि बुद्धिवंताची बुद्धि मी व्यर्थ करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 ‘मी ज्ञानवंतांचे ज्ञान नष्ट करीन व बुद्धिवंतांची बुद्धी शून्यवत करीन’, असा धर्मशास्त्रलेख आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 कारण असे लिहिले आहे: “ज्ञानी लोकांचे ज्ञान मी नष्ट करेन. बुद्धिमानाची बुद्धी मी निष्फळ करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ करिंथ 1:19
9 Iomraidhean Croise  

सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निवळ मूर्ख बनले आहेत; त्यांची मसलत पशूच्या समान झाली आहे; “मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे” असे तुम्ही फारोला कसे म्हणता?


मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.


शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!


कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे.


आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे; आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त; तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत.


बंधुजनहो, मी तुमच्याकरता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुल्लोसाला लागू केल्या आहेत; ह्यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आमच्यापासून शिकावा म्हणजे तुमच्यापैकी कोणीही एकासाठी दुसर्‍यावर फुगणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan