Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 सर्व द्वारपाळांच्या कामासाठी दोनशे बारा लोक निवडले होते. त्यांना दावीद व शमुवेल द्रष्टा ह्यांनी ह्या कामगिरीवर नेमले होते. त्यांच्या-त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांना नमूद केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 निवासमंडपाचे रक्षण करणारे असे एकंदर दोनशे बारा निवडक द्वाररक्षक होते. आपापल्या गावांच्या वंशावळ्यांमध्ये त्यांची नावे लिहिलेली आहेत. त्यांचा विश्वासूपणा पाहून दावीद आणि शमुवेल संदेष्टा यांनी त्यांची नेमणूक केली होती

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 द्वारपालांच्या कामासाठी 212 लोक निवडले होते. त्यांच्या गावी त्यांच्या वंशावळीत त्यांची नोंद केलेली होती. विश्वासयोग्यता पाहून त्यास दावीद व शमुवेल संदेष्टा यांनी त्या कामगिरीवर नेमले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:22
18 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणेच याजक व लेवी ह्यांच्या कार्यक्रमाचा, परमेश्वराच्या मंदिरातील सेवेसंबंधाच्या सर्व कामाचा आणि सेवेसंबंधाच्या सर्व पात्रांचा बेत त्याने त्याला सांगून दिला;


पाहा, देवाच्या मंदिराच्या सेवेसाठी याजक व लेवी ह्यांचा कार्यक्रम नेमून दिला आहे आणि सर्व प्रकारची सेवा करण्यासाठी हरप्रकारचे काम मनापासून करणारे कुशल पुरुषही तुझ्याबरोबर असतील; त्याप्रमाणेच सरदार लोक व सर्व प्रजाजन हे सर्वस्वी तुझ्या हुकमात असतील.”


दावीद राजाचे साद्यंत वृत्त अथपासून इतिपर्यंत शमुवेल द्रष्टा ह्याच्या ग्रंथात, नाथान संदेष्टा ह्याच्या ग्रंथात आणि गाद द्रष्टा ह्याच्या ग्रंथात लिहिले आहे.


आणि ओबद्या बिन शमाया, बिन गालाल, बिन यदूथून; आणि बरेख्या बिन आसा, बिन एलकाना; हा नटोफाथी ह्यांच्या वस्तीत राहत असे.


ते व त्यांचे वंशज परमेश्वराच्या मंदिराच्या म्हणजे दर्शनमंडपाच्या द्वारपाळाचे काम पाळीपाळीने पाहत असत.


तव्यावर ज्या वस्तू भाजण्यात येत त्यांवर देखरेख करण्यासाठी लेव्यांपैकी मत्तिथ्या ह्याला नेमले होते, हा शल्लूम कोरहीचा ज्येष्ठ पुत्र.


कोणत्याही प्रकारे कोणी अशुद्ध असला तर त्याचा आत प्रवेश होऊ नये म्हणून त्याने परमेश्वराच्या द्वाराशी द्वारपाळ नेमले.


त्याच्या हाताखाली एदेन, मिन्यामीन, येशूवा, शमाया, अमर्‍या व शखन्या हे होते; ते याजकांच्या नगरात राहत असत; त्यांच्या सर्व भाऊबंदांना, मग ते लहान असोत की मोठे असोत, त्यांच्या-त्यांच्या क्रमानुसार प्रामाणिकपणे वाटणी करून देण्यासाठी त्यांना नेमले होते.


शिवाय वंशावळीत नोंदलेल्या मुलाबाळांना, स्त्रियांना, पुत्रांना व कन्यांना अशा सर्व समुदायाला वाटणी देत असत, कारण ते आपणांस प्रामाणिकपणाने पवित्र करत असत.


लेव्यांपैकी यहूदातले काही वर्ग बन्यामिनाकडे होते.


याजक व लेवी ह्यांचे ठरलेले वाटे नगरोनगरीच्या शेतांप्रमाणे गोळा करावेत म्हणून त्या दिवशी भांडारे, परमेश्वराप्रीत्यर्थ समर्पित अंश, प्रथमफळे व दशमांश ह्यांच्या कोठड्यांवर लोक नेमण्यात आले; कारण याजक व लेवी हे हजर राहिल्याकारणाने यहूदास आनंद झाला होता.


(पूर्वीच्या काळी इस्राएलात कोणी देवाकडे प्रश्‍न करण्यास जाई तेव्हा तो म्हणत असे की, “चला, द्रष्ट्याकडे जाऊ;” हल्ली ज्याला संदेष्टा म्हणतात त्याला पूर्वी द्रष्टा म्हणत.)


Lean sinn:

Sanasan


Sanasan