Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 आणि शल्लूम बिन कोरे, बिन एब्यासाफ, बिन कोरह, आणि त्यांच्या पितृकुळातील त्यांचे भाऊबंद जे कोरही त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक असून ते दर्शनमंडपाचे द्वारपाळ असत; त्यांचे वाडवडील परमेश्वराच्या छावणीवरील कामदार असून द्वारपाळ असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 शल्लूम हा कोरे याचा पुत्र. कोरे हा एब्यासाफचा पुत्र. एब्यासाफ कोरहचा पुत्र. शल्लूम आणि त्याचे भाऊबंद हे द्वारपाल होते. ते कोरहाच्या वंशातले होते. निवासमंडपाच्या द्वाररक्षणाचे काम त्यांच्याकडे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते परमेश्वराच्या छावणीवर कामदार असून व्दारपालाचे काम पार पाडत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 शल्लूम जो कोरेचा पुत्र, जो एब्यासाफचा पुत्र, जो कोरहचा पुत्र आणि त्यांच्या कुटुंबातील त्याचे द्वारपाल भाऊबंद जे कोरही होते, त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक केलेली असून, ते त्यांच्या पूर्वजांसारखे याहवेहच्या भवनाच्या व्दाराची रखवाली करीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:19
16 Iomraidhean Croise  

मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतींना आज्ञा केली की, “तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा, तिच्यामागून जो जाईल त्याचा वध करा.” कारण याजकाने असे सांगितले आहे की, ”परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये.”


यहोयादा याजकाने केलेल्या हुकुमाप्रमाणे त्या शतपतींनी केले; शब्बाथ दिवशी जे लोक कामावर यायचे होते व जे कामावरून घरी जायचे होते ते सर्व घेऊन ते यहोयादा याजकाकडे आले.


नंतर पेटीत पुष्कळ पैसा झाला आहे असे पाहून राजाचा चिटणीस व मुख्य याजक ह्यांनी येऊन तो परमेश्वराच्या मंदिरात मिळालेला पैसा थैल्यांत बांधून तोलला.


हे ह्या काळपर्यंत पूर्वेस राजाच्या देवडीवर देवडीवाल्यांचे काम करीत असत; लेव्यांच्या छावणीचे द्वारपाळ हेच होते.


पूर्वीच्या काळी फिनहास बिन एलाजार हा त्यांचा सरदार असे; परमेश्वर त्यांच्याबरोबर असे.


हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.


हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.


अहो सर्व लोकहो, हे ऐका; जगात राहणारे उच्च व नीच,


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले;


Lean sinn:

Sanasan


Sanasan