Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 हे ह्या काळपर्यंत पूर्वेस राजाच्या देवडीवर देवडीवाल्यांचे काम करीत असत; लेव्यांच्या छावणीचे द्वारपाळ हेच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 हे लोक आता राजाच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वारापाशी उभे असतात. हे लेवीच्या वंशातले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 आजवर ते राजाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर कार्यरत आहेत; लेवींच्या छावणीचे द्वारपाल हेच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:18
11 Iomraidhean Croise  

त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली.


आणि शतपती, हुजरे, गारदी व देशातले सर्व लोक ह्यांना बरोबर घेऊन राजाला परमेश्वराच्या मंदिरातून उतरवून खाली नेले आणि गारद्यांच्या वेशीच्या द्वाराने त्याला राजमंदिरात पोचवले. तेव्हा राजा राजासनावर विराजमान झाला.


शब्बाथ दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधली होती ती व राजाला बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे दार केले होते ते, ही दोन्ही मंदिरापासून वेगळी करण्यात आली.


द्वारपाळांपैकी हे : शल्लूम, अक्कूब, तल्मोन, अहीमान, व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता;


आणि शल्लूम बिन कोरे, बिन एब्यासाफ, बिन कोरह, आणि त्यांच्या पितृकुळातील त्यांचे भाऊबंद जे कोरही त्यांची उपासनेच्या कामावर नेमणूक असून ते दर्शनमंडपाचे द्वारपाळ असत; त्यांचे वाडवडील परमेश्वराच्या छावणीवरील कामदार असून द्वारपाळ असत.


आणि मी त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले; द्वारपाळ मासेया बिन शल्लूम ह्याच्या कोठडीच्या वर असलेल्या सरदारांच्या कोठडीच्या बाजूला देवाचा भक्त हानान बिन इग्दल्या ह्याच्या पुत्रांची कोठडी होती तिच्यात त्यांना नेले.


मग त्याने मला त्या मंदिराच्या पूर्वाभिमुख असलेल्या बाहेरच्या द्वारास जाणार्‍या वाटेने परत आणले; ते द्वार बंद होते.


मग तो बरा झालेला पांगळा पेत्र व योहान ह्यांना बिलगून राहिला असता सर्व लोक आश्‍चर्यचकित होऊन त्यांच्याकडे शलमोनाची देवडी नावाच्या ठिकाणी धावत आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan