Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएलाच्या सर्व लोकांची नोंद वंशावळीप्रमाणे केलेली आहे. इस्राएलाच्या राजाच्या पुस्तकात ती लिहिलेली आहे. त्यांच्या पापामुळे यहूदाच्या लोकांस बाबेल येथे कैद करून नेण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याप्रकारे सर्व इस्राएली लोकांच्या वंशावळ्या इस्राएलच्या व यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेल्या आहेत; या लोकांच्या अविश्वासूपणामुळे त्यांना बंदिवान करून बाबिलोन देशी नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 9:1
22 Iomraidhean Croise  

यराबामाने इतर कोणत्या गोष्टी केल्या, युद्ध कसे केले व राज्य कसे चालवले ह्या सर्वांचे वर्णन इस्राएलांच्या राजांच्या बखरीत केले आहे.


त्याने अवघे यरुशलेम म्हणजे सर्व सरदार, सर्व पराक्रमी वीर मिळून एकंदर दहा हजार लोक आणि सर्व कारागीर व लोहार ह्यांना कैद करून नेले; देशात अगदी कंगाल लोकांखेरीज कोणी राहिले नाही.


त्याने यहोयाखीनास बाबेलास नेले; राजाची आई, राजाच्या स्त्रिया, खोजे व देशातील मोठमोठे लोक ह्यांना त्याने कैद करून यरुशलेमेहून बाबेलास नेले.


एकंदर सात हजार धट्टेकट्टे लोक आणि एक हजार कारागीर व लोहार बाबेलच्या राजाने कैद करून बाबेलास नेले; हे सारे युद्धास लायक व बळकट होते.


ऊलामाचे वंशज शूर वीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्रपौत्र मिळून दीडशे होते. हे सर्व बन्यामिनाच्या वंशातले होते.


ह्यास्तव परमेश्वराने त्यांच्यावर अश्शूरच्या राजाचे सेनानायक पाठवले. त्यांनी मनश्शेस आकड्यांनी पकडून व बेड्या घालून बाबेलास नेले.


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने जे लोक पाडाव करून बाबेलास नेले होते त्यांतले त्या मुलखात राहणारे बंधमुक्त होऊन यरुशलेमास व यहूदातील आपापल्या नगरी परत गेले ते हे :


तेल्मेलह, तेल्हर्षा, करूब, अद्दान व इम्मेर येथून जे वर आले ते हेच होते, परंतु ते इस्राएलातले होते किंवा नाही ह्याविषयी आपापली पितृकुळे व आपापली वंशावळी त्यांना दाखवता आली नाही.


लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.


सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले. जे प्रथम यरुशलेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व तिच्यात हे लिहिलेले सापडले :


ह्यांनी आपल्या वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रांत शोधून पाहिले, पण ते सापडले नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यांना याजकपदाच्या यादीतून काढून टाकले.


वीर व योद्धा, न्यायाधीश व संदेष्टा, दैवज्ञ व वडील,


दक्षिणेतील नगरे बंद पडली आहेत ती उघडायला कोणी नाही; यहूदाला सर्वस्वी बंदिवान करून नेले आहे, तो पूर्णपणे बंदिवान झाला आहे.


तेव्हा गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने नगरात अवशिष्ट राहिलेले लोक आणि जे फितून त्याच्याकडे गेले होते ते आणि जे कोणी लोक शेष राहिले होते ते, अशा सर्वांना कैद करून बाबेलास नेले.


प्रभूने यहूदाचा राजा यहोयाकीम ह्याला त्याच्या हाती दिले; त्याप्रमाणेच देवाच्या मंदिरातील काही पात्रेही त्याच्या हाती दिली; त्याने ती शिनार देशात आपल्या दैवताच्या घरी नेली आणि आपल्या दैवताच्या भांडारात ठेवली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan