Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 7:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 त्याप्रमाणेच मनश्शेच्या वंशजांच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, मगिद्दो व त्याची खेडी, दोर व त्याची खेडी. ह्यांत इस्राएलाचा पुत्र योसेफ ह्याचे वंशज राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 मनश्शेच्या सीमेला लागून असलेली बेथ-शान, तानख, मगिद्दो, दोर ही नगरे व त्यांच्या भोवतालचा प्रदेश एवढ्या भागात इस्राएलचा पुत्र योसेफ याचे वंशज राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 7:29
12 Iomraidhean Croise  

तानख, मगिद्दो आणि बेथ-शानचा अवघा प्रदेश म्हणजे सारतानाजवळील इज्रेलाखालचा बेथ-शानापासून आबेल-महोलापर्यंत आणि यकमामाच्या पलीकडच्या बाजू-पर्यंत असलेला प्रदेश ह्यांत अहीलुदाचा पुत्र बाना हा होता;


शलमोन राजाने लोक वेठीस धरून परमेश्वराचे मंदिर, आपला राजवाडा, मिल्लो, यरुशलेमेचा तट, हासोर, मगिद्दो व गेजेर ही उभारली त्याचा वृत्तान्त असा.


त्याच्या कारकिर्दीच्या अखेरीस मिसर देशाचा राजा फारो-नखो हा अश्शूराच्या राजावर चढाई करून फरात महानदापर्यंत गेला असताना योशीया राजा त्याच्यावर चालून गेला; योशीया मगिद्दो येथे त्याच्यासमोर आला तेव्हा त्याला त्याने ठार केले.


हे पाहून यहूदाचा राजा अहज्या हा बागेतील भवनाच्या रस्त्याने पळून गेला. येहूने त्याचा पाठलाग करून म्हटले, “त्यालाही रथातच ठार करा.” त्यांनी त्याला इब्लामाजवळील गुरघाटात मार दिला. तो तसाच मगिद्दोपर्यंत पळून जाऊन तेथे मेला.


तथापि योशीया त्याच्याकडून आपला मोर्चा न फिरवता त्याच्याशी लढण्यास वेशांतर करून गेला; देवाचे वचन नखोच्या द्वारे प्राप्त झाले होते ते न जुमानता तो मगिद्दोच्या खोर्‍यात युद्ध करण्यास आला.


त्या दिवशी मगिद्दोनाच्या खोर्‍यातील हदाद्रीमोनाच्या आकांताप्रमाणे यरुशलेमेत मोठा आकांत होईल.


त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.


राजे येऊन लढले; त्या वेळी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांजवळ तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट घेतली नाही.


त्यांनी त्याची हत्यारे अष्टारोथ देवीच्या मंदिरात ठेवली व त्याचे धड बेथ-शानच्या गावकुसावर टांगले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan