१ इतिहास 5:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्यास्तव इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल आणि त्याच देशाचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्यांना उठवले; त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक ह्यांना पाडाव करून हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत त्यांना नेऊन ठेवले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांस कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत. Faic an caibideil |