Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 5:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देवाशी फितुरी केली, आणि देवाने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता त्यांच्या देवांच्या नादी लागून ते अत्याचारी बनले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 ते आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराशी अविश्वासू झाले आणि परमेश्वराने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांच्या नादी लागून ते व्यभिचारी बनले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 5:25
14 Iomraidhean Croise  

अश्शूरचा राजा पूल ह्याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने मदत करून गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्याला एक हजार किक्कार2 चांदी दिली.


त्यांच्या पितृकुळांपैकी प्रमुख पुरुष होते ते हे : एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या व यहदीएल; हे महावीर व नामांकित पुरुष असून आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते.


ह्या प्रकारे सर्व इस्राएल लोकांची त्यांच्या-त्यांच्या वंशांप्रमाणे गणती झाली; त्यांच्या वंशावळ्या इस्राएलाच्या राजांच्या बखरीत नमूद केल्या आहेत; यहूदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यांना पाडाव करून बाबेल देशात नेले.


तू सावध राहा. देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करायचा नाही; नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील, आणि त्यांच्यातल्या कोणी तुला बोलावले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील;


परमेश्वर होशेयाबरोबर प्रथम बोलला तेव्हा तो त्याला म्हणाला, “जा, एक जारिणी बायको करून घे व जारकर्माची मुले आपली अशी करून घे; कारण परमेश्वराचा त्याग करणे हे घोर जारकर्म हा देश करीत आहे.”


हे इस्राएला, इतर राष्ट्रांप्रमाणे आनंदाने उल्लासू नकोस, कारण तू व्यभिचार करून आपल्या देवाला सोडले आहेस; प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराची कमाई तुला आवडली आहे.


तिच्या कपाळावर “मोठी बाबेल, कलावंतिणींची1 व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई,” हे गूढ अर्थाचे नाव लिहिलेले होते.


आपल्या पूर्वजांचा देव जो परमेश्वर, ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्याचा त्यांनी त्याग केला व ते अन्य देवांच्या म्हणजे सभोवतालच्या राष्ट्रांतील देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागले आणि तेणेकरून त्यांनी परमेश्वराला चीड आणली.


तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही.


गिदोन मरण पावल्यावर लोक पुन्हा फिरले आणि व्यभिचारी मतीने बआल देवाच्या नादी लागले; त्यांनी बआल-बरीथ1 ह्याला आपला देव केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan