Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 5:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 बहुत लोकांचा संहार झाला, कारण युद्ध देवाच्या पक्षाचे होते. त्यांचा स्वतःचा पाडाव होईपर्यंत ते त्यांच्या ठिकाणी वस्ती करून राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 5:22
11 Iomraidhean Croise  

गाद ह्याच्यावर हल्लेखोरांची टोळी हल्ला करील; तथापि तो त्यांच्या पिछाडीवर हल्ला करील.


इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


ज्यांची नावे वर दाखल केली आहेत त्यांनी यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या कारकिर्दीत तेथे येऊन तेथील मूनी नावाच्या लोकांचा त्यांच्या डेर्‍यांसहित अगदी संहार करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.


त्यांनी त्यांची गुरेढोरे हरण केली; पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे एवढी जनावरे व एक लक्ष माणसे त्यांनी नेली.


ह्यास्तव इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल आणि त्याच देशाचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्यांना उठवले; त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक ह्यांना पाडाव करून हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत त्यांना नेऊन ठेवले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.


एलकानाचा वंश : त्याचा पुत्र सोफय, त्याचा पुत्र नहथ,


पलिष्टी, गुर-बालवासी अरब व मऊनी ह्यांच्याविरुद्ध देवाने त्याला साहाय्य केले.


मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


तुमच्यातला एक जण हजारांना पळवून लावील, कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला सांगितल्याप्रमाणे तो स्वतः तुमच्यासाठी लढणारा आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan