१ इतिहास 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 कारण यहूदाचे वर्चस्व त्याच्या बांधवांवर स्थापित होऊन त्याच्या वंशातला राजा झाला, पण ज्येष्ठत्वाचा हक्क योसेफाचाच होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला. Faic an caibideil |
परंतु इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे; मी इस्राएलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहूदाने अग्रणी व्हावे आणि यहूदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली आणि माझ्या पित्याच्या पुत्रांतून मलाच सर्व इस्राएलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले.