Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 5:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याची वंशावळी : रऊबेन हा ज्येष्ठ पुत्र होता खरा, पण त्याने आपल्या बापाची खाट भ्रष्ट केली म्हणून त्याचा ज्येष्ठपणाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफ ह्याच्या संततीस देण्यात आला, तरीपण वंशावळी ज्येष्ठपणाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आली नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 5:1
23 Iomraidhean Croise  

परमेश्वर तिला म्हणाला, “तुझ्या गर्भाशयात दोन राष्ट्रे आहेत; तुझ्या उदरातून दोन वंश निघतील; एक वंश दुसर्‍या वंशाहून प्रबळ होईल; आणि वडील धाकट्याची सेवा करील.”


याकोब त्याला म्हणाला; “पहिल्याने तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे.”


लेआ गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याचे नाव तिने ‘रऊबेन’ ठेवले; ती म्हणाली, “परमेश्वराने माझ्या दु:खाकडे पाहिले आहे, कारण आता माझा नवरा माझ्यावर प्रीती करील.”


इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


इस्राएलाची संतती म्हणजे अर्थात याकोब व त्याचे पुत्रपौत्र मिसरात गेले त्यांची नावे ही : याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन,


मी मिसरात तुझ्याकडे येण्यापूर्वी, तुला जे दोन मुलगे मिसरात झाले ते माझेच आहेत, जसे रऊबेन व शिमोन तसेच एफ्राईम व मनश्शे हेही माझेच होत.


इस्राएलाचे पुत्र हे : रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,


मरारीच्या वंशातला होसा ह्याचे पुत्र : शिम्री मुख्य; हा ज्येष्ठ नसताही त्याच्या बापाने त्याला मुख्य केले होते;


त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याचे प्रमुख पुरुष हे : इस्राएलाचा पहिला मुलगा रऊबेन ह्याचे मुलगे हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी; ही रऊबेनाची कुळे.


आपल्या सावत्र आईची कायाही उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाचीच काया होय.


जो आपल्या पित्याच्या बायकोशी गमन करतो तो आपल्या पित्याची काया उघडी करतो; त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


तुमच्याबरोबर जे असावेत त्यांची नावे ही : रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर;


कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ


इस्राएलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन; रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली ती ही : हनोख ह्याचे हनोखी कूळ; पल्लू ह्याचे पल्लूवी कूळ;


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


पण नावडतीच्या पुत्राचा ज्येष्ठत्वाचा हक्क मान्य करून त्याने त्याला आपल्या एकंदर मालमत्तेतून दुप्पट वाटा द्यावा; कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. ज्येष्ठत्वाचा हक्क त्याचाच आहे.


‘जो आपल्या सावत्र आईशी गमन करतो तो आपल्या बापाची बेअब्रू करतो म्हणून तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


प्रथमजन्मलेल्या गोर्‍ह्यासारखा त्याचा प्रताप आहे; त्याची शिंगे रानबैलाच्या शिंगांप्रमाणे होत; त्यांनी तो सर्व राष्ट्रांना पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हुंदडील; असे एफ्राइमाचे लाखो व मनश्शेचे हजारो आहेत.


तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे;


मग यहूदा वंशाचे लोक गिलगालात यहोशवाकडे आले आणि कनिज्जी यफुन्नेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, “परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश-बर्ण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan