Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की, “त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 याबेस आपल्या भावांपेक्षा फार आदरणीय होता. त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले. ती म्हणाली, “कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 याबेस आपल्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता; “त्यास प्रसवताना मला फार क्लेश झाले” असे म्हणत त्याच्या आईने त्याचे नाव याबेस ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:9
10 Iomraidhean Croise  

तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”


त्या तरुणाने तसे करण्यास विलंब लावला नाही, कारण याकोबाच्या मुलीवर त्याचे मन बसले होते; त्याचा मान त्याच्या बापाच्या घराण्यातल्या सर्वांहून मोठा होता.


ती तर मरण पावली. तिचा प्राण जाता जाता तिने मुलाचे नाव ‘बेनओनी’ (माझ्या दु:खाचा पुत्र) ठेवले; तथापि त्याच्या बापाने त्याचे नाव ‘बन्यामीन’ (माझ्या उजव्या हाताचा पुत्र) असे ठेवले.


याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.


कोसाला आनूब व सोबेबा हे झाले, तसेच त्याच्यापासून हारुमाचा पुत्र अहरहेल ह्याची कुळे निपजली.


तो आपल्या बायकोपाशी गेला आणि ती गर्भवती होऊन तिला एक पुत्र झाला; त्याने त्याचे नाव बरीया (भाग्यहीन) असे ठेवले, कारण त्याच्या घराण्यावर दुर्दैव ओढवले होते.


तुझी मातापितरे आनंद पावोत, तुझी जन्मदात्री हर्ष पावो,


तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.


तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.


तिने त्या बालकाचे नाव ईखाबोद (वैभव नाहीसे झाले) असे ठेवले; ती म्हणाली, “इस्राएलाचे वैभव नाहीसे झाले आहे.” देवाचा कोश गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले म्हणून ती असे म्हणाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan