१ इतिहास 4:41 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 ज्यांची नावे वर दाखल केली आहेत त्यांनी यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या कारकिर्दीत तेथे येऊन तेथील मूनी नावाच्या लोकांचा त्यांच्या डेर्यांसहित अगदी संहार करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांसही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनी नावाचे लोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी गायराने असल्याने ते तेथे राहिले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता. Faic an caibideil |