Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 4:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 याबेसाने इस्राएलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा : “तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मुलखाचा विस्तार वाढवशील आणि माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल!” त्याने मागितलेला हा वर देवाने त्याला दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 याबेसाने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तू खरोखर मला आशीर्वाद देशील. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढविशील. माझ्यावर संकट येऊन मी दुःखीत होऊ नये म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती चांगले होईल.” आणि देवाने त्याची विनंती मान्य केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 याबेसाने इस्राएलाच्या परमेश्वराजवळ प्रार्थना केली, “तुम्ही मला आशीर्वादित करा, माझ्या क्षेत्राचा विस्तार करा! माझ्यावर कोणतेही अरिष्ट येऊन, मला क्लेश वाटू नये म्हणून तुमचा हात माझ्यावर राहो.” परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 4:10
56 Iomraidhean Croise  

मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील;


मग तो तेथून निघाला आणि बेथेलच्या पूर्वेकडे डोंगर होता तेथे जाऊन त्याने डेरा दिला. त्याच्या पश्‍चिमेस बेथेल होते व पूर्वेस आय होते; तेथे त्याने परमेश्वराची वेदी बांधली आणि परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली.


याकोबाने असा नवस केला की, “देव माझ्याबरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल,


आणि मी आपल्या पितृगृही सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल,


मग तो म्हणाला, “पहाट होत आहे, मला जाऊ दे.” तो म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यायचा नाही.”


त्याने मग त्याला विचारले, “तुझे नाव काय?” तो म्हणाला, “याकोब.”


त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


आणि तेथे त्याने एक वेदी बांधून तिचे नाव एल-एलोहे-इस्राएल (देव, इस्राएलाचा देव) असे ठेवले.


ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”


परमेश्वराचे उपकारस्मरण करा, त्याचे नाम घ्या; राष्ट्रांना त्याची कृत्ये जाहीर करा.


शूहाचा भाऊ कलूब ह्याला महीर झाला; हा एष्टोनाचा बाप.


याबेस हा आपल्या भाऊबंदांमध्ये फार प्रतिष्ठित होता; त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे ठेवून म्हटले की, “त्याला प्रसवताना मला फार क्लेश झाले.”


मी देवाचा धावा करी व तो माझे ऐके, त्यामुळे मला माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांनी हसावे ना! नीतिमान व सात्त्विक मनुष्याला हसावे ना!


तुझा हात मला साहाय्य करण्यास सिद्ध असो, कारण मी तुझे विधी स्वीकारले आहेत.


परमेश्वर सर्व अनिष्टांपासून तुझे रक्षण करील. तुझ्या जिवाचे रक्षण करील.


तो आपले भय धरणार्‍यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.


त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले; तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस.


तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर;


आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील.


मी तर देवाचा धावा करीन, आणि परमेश्वर मला तारील.


तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.


त्याचे नाव सर्वकाळ राहो; सूर्य आहे तोवर त्याचे नाव वृद्धिंगत होवो; त्याच्या नावाने लोक आपणांस धन्य म्हणोत; सर्व राष्ट्रे त्याचा धन्यवाद करोत.


त्याच्या याजकांपैकी मोशे व अहरोन, आणि त्याच्या नावाचा धावा करणार्‍यांपैकी शमुवेल, ह्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्यांना उत्तर दिले.


परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.


व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख; दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस; मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे.


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.


मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.


तेव्हा “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील” असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.


आणि आम्हांला परीक्षेत आणू नकोस; तर आम्हांला वाइटापासून सोडव. [कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझी आहेत. आमेन.’]


“जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.


मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही.


तिसर्‍यांदा तो त्याला म्हणाला, “योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय?” “माझ्यावर प्रेम करतोस काय?” असे तिसर्‍यांदा त्याला म्हटले, म्हणून पेत्र दु:खी होऊन त्याला म्हणाला, “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे; मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” येशूने त्याला म्हटले, “माझी मेंढरे चार.


देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


तुमचे आज्ञापालन सर्वांना प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुमच्याविषयी मी आनंद मानतो; तरी जे चांगले आहे त्यासंबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाइटाविषयी साधेभोळे असावे, अशी माझी इच्छा आहे.


देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून :


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे;


जास्तीत जास्त, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणार्‍या शक्तीप्रमाणे आधिक्याने कार्य करण्यास जो समर्थ आहे,


देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका; खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात.


प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील; त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


तेव्हा एली तिला म्हणाला, “तू सुखाने जा, इस्राएलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहेस ते तो तुला देवो.”


ह्या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला; “हा परमेश्वराकडे मागितला” असे म्हणून तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले.


तेव्हा हन्ना म्हणाली, “माझे स्वामी! आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे.


ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan