Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 गश्शूरचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून अबशालोम हा तिसरा; हग्गीथेचा पुत्र अदोनीया हा चौथा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र, हग्गीथचा पुत्र अदोनीया हा चौथा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तिसरा पुत्र अबशालोम हा गशूरचा राजा तलमयची कन्या माकाहपासून झाला. चौथा पुत्र अदोनियाह हग्गीथपासून जन्मला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 3:2
20 Iomraidhean Croise  

ह्यानंतर असे झाले की दाविदाचा पुत्र अबशालोम ह्याची एक सुंदर बहीण होती, तिचे नाव तामार; दाविदाचा पुत्र अम्नोन हा तिच्यावर मोहित झाला.


अबशालोम पळून गशूरास गेला; तेथे तो तीन वर्षे राहिला.


मग यवाब उठून गशूराला गेला व तेथून अबशालोमाला यरुशलेमेस घेऊन आला.


अबशालोम यवाबाला म्हणाला, “मला गशूराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते, असा निरोप तुझ्या हाती राजाला पाठवावा म्हणून मी तुला येथे ये, असे सांगून पाठवले होते. तर आता मला राजाचे दर्शन करवून दे; मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे.”


मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.”


यवाब म्हणाला, “तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.” मग त्याने हाती तीन तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकले.


आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्‍यात आहे. त्या मनोर्‍याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.


तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्‍गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा : तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”


कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;


हग्गीथीपासून चौथा पुत्र अदोनीया झाला; अबीटलेपासून पाचवा पुत्र शफाट्या झाला;


त्या समयी हग्गीथेचा पुत्र अदोनीया शिरजोर होऊन म्हणाला, “मी राजा होणार.” त्याने रथ, स्वार व आपल्यापुढे धावण्यासाठी पन्नास पुरुष ठेवले.


“तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.


शलमोन राजाने आपल्या आईस उत्तर दिले, “अदोनीयासाठी तू शुनेमकरीण अबीशग हीच तेवढी का मागतेस! तो माझा वडील बंधू आहे त्या अर्थी त्याच्यासाठी किंबहुना अब्याथार याजक व सरूवेचा पुत्र यवाब ह्यांच्यासाठी राज्यदेखील माग.”


गशूर व अराम ह्यांनी त्यांच्यापासून हव्वोथयाईर व कनाथ आणि त्यांच्या आसपासची खेडीपाडी अशी एकंदर साठ नगरे हस्तगत केली. गिलादाचा बाप माखीर ह्याची ही संतती होय.


दाविदाला हेब्रोन येथे पुत्र झाले ते हे : अहीनवाम इज्रेलकरणीपासून अम्नोन हा ज्येष्ठ पुत्र; अबीगईल कर्मेलकरीण हिच्यापासून दानीएल हा दुसरा पुत्र;


अबीटलेपासून शफाट्या हा पाचवा; व दाविदाची बायको एग्ला हिचा पुत्र इथ्रम हा सहावा.


तरी इस्राएल लोकांनी गशूरी व माकाथी ह्यांना देशाबाहेर काढले नाही; गशूरी व माकाथी आजवर इस्राएलात वस्ती करून आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan