Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 29:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्याशिवाय माझे चित्त माझ्या देवाच्या मंदिराकडे लागले आहे म्हणून पवित्र मंदिरासाठी जो मी संग्रह केला आहे त्याशिवाय आणखी माझा स्वतःचा सोन्यारुप्याचा निधी मी देवाच्या मंदिरासाठी देतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आता कारण मी माझे चित्त देवाच्या मंदिराकडे लावले आहे. म्हणून पवित्र मंदिरासाठी मी जी ही तयारी केली त्याशिवाय आणखी माझा वैयक्तिक सोन्या, रुप्याचा ठेवाही देत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 माझा भक्तिभाव माझ्या परमेश्वराच्या मंदिरावर आहे, म्हणून माझ्या व्यक्तिगत खजिन्यातून जो सोने आणि चांदीचा मी संग्रह केला आहे, तो मी परमेश्वराच्या मंदिरासाठी देतो. याव्यतिरिक्त या पवित्र मंदिरासाठी मी दिले आहे:

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 29:3
14 Iomraidhean Croise  

यहोआशाने याजकाला सांगितले की, ‘समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा, प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरवील तो पैसा आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणत तो सर्व पैसा,


दावीद राजा अर्णानाला म्हणाला, “नाही, नाही, मी पुरे मोल देऊन ह्या वस्तू घेईन; कारण जे तुझ्या मालकीचे आहे ते मी परमेश्वरासाठी घेणार नाही; फुकट मिळालेला होमबली मी अर्पण करणार नाही.”


माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्‍हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे.


मंदिराच्या भिंती मढवण्यासाठी तीन हजार किक्कार1 ओफीरचे सोने व सात हजार किक्कार शुद्ध रुपे मी देतो;


हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.


परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.


हे सेनाधीश परमेश्वरा, तुझी निवासस्थाने किती रम्य आहेत!


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


इस्राएल लोकांना असे सांग की त्यांनी माझ्यासाठी अर्पण आणावे; ज्या कोणाची मनापासून अर्पण करण्याची इच्छा असेल त्या प्रत्येकापासून माझ्यासाठी अर्पण स्वीकारावे.


कारण आपल्या राष्ट्रावर हा प्रेम करतो आणि ह्यानेच आमच्याकरता सभास्थान बांधून दिले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan