१ इतिहास 28:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परंतु इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने माझ्या वडिलांच्या सर्व घराण्यातून मलाच निवडले आहे; मी इस्राएलावर कायमचा राजा व्हावे म्हणून यहूदाने अग्रणी व्हावे आणि यहूदाच्या घराण्यात माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली आणि माझ्या पित्याच्या पुत्रांतून मलाच सर्व इस्राएलावर राजा करावे असे त्याच्या मर्जीस आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 इस्राएलाचा देव परमेश्वर याने मला सर्वकाळ इस्राएलाचा राजा होण्यासाठी माझ्या वडिलाच्या सर्व घराण्यातून मला निवडून घेतले आहे. कारण त्याने यहूदाच्या वंशातून माझ्या पित्याचे घराणे प्रमुख व्हावे अशी त्याने निवड केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तरीपण याहवेह इस्राएलच्या परमेश्वराने माझ्या सर्व घराण्यातून इस्राएलावर सदासर्वदा राज्य करण्यासाठी मला राजा म्हणून निवडले आहे. त्यांनी प्रथम यहूदाहच्या गोत्राची आणि या गोत्रातून माझ्या पित्याच्या घराण्याची आणि माझ्या पित्याच्या सर्व पुत्रांमधून माझी निवड करून आनंद मानला असून मला इस्राएलावर राजा केले आहे. Faic an caibideil |