Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




१ इतिहास 28:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग दावीद राजा उभा राहून म्हणाला, “माझे बांधव व माझे प्रजाजनहो, माझे म्हणणे ऐका; परमेश्वराच्या कराराच्या कोशासाठी आणि आपल्या देवाच्या पादासनासाठी एक विश्रामभवन बांधावे असा माझा मानस असून ते बांधण्याची मी तयारी केली होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 नंतर राजा दावीद त्यांच्यापुढे उभा राहून म्हणाला, “माझ्या बांधवांनो आणि लोकांनो, माझे ऐका परमेश्वराचा कराराचा कोश ठेवण्यासाठी आणि देवाच्या पादासनासाठी एक विसाव्याचे घर बांधावे असा माझा मानस होता. त्याच्या बांधकामासाठी मी तयारी ही केली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 राजा दावीद उभा राहिला व म्हणाला: “माझ्या इस्राएली बंधूंनो, माझ्या लोकांनो, माझे ऐका. याहवेहच्या पवित्र कराराच्या कोशासाठी आणि परमेश्वराच्या पादास्थानासाठी एक भवन असावे म्हणून मंदिर बांधण्याची माझी इच्छा होती. आणि मी मंदिर बांधावयास योजना केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




१ इतिहास 28:2
30 Iomraidhean Croise  

आपला मुलगा योसेफ आपल्याकडे आला आहे असे कोणी याकोबाला कळवले तेव्हा इस्राएल सावरून पलंगावर बसला.


आपला स्वामीराजा दावीद ह्याच्याकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की, ‘आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो.’ तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले.


“माझे वडील दावीद ह्यांचे शत्रू परमेश्वर पादाक्रांत करीपर्यंत त्यांच्या सभोवार युद्ध चालले असल्यामुळे त्यांना आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधता आले नाही हे आपल्याला ठाऊक आहे.


“माझा सेवक दावीद ह्याला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या निवासासाठी तुला मंदिर बांधायचे नाही.


मी संकटात असताही परमेश्वराच्या मंदिराप्रीत्यर्थ एक लक्ष किक्कार सोने व दहा लक्ष किक्कार चांदी सिद्ध केली आहे; पितळ व लोखंड हे तर विपुल आहे, ते अपरिमित आहे; लाकूड व चिरे मी तयार केले आहेत, तुलाही त्यांत भर घालता येईल.


मग त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला बोलावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली.


दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “माझा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा,


कोश स्थायिक झाल्यावर दाविदाने परमेश्वराच्या मंदिरात जे गायकगण नेमले होते ते हे :


माझा बाप दावीद ह्याचा मनोदय असा होता की, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधावे;


माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”


“हे सर्वकाळ माझे विश्रामस्थान आहे; येथे मी राहीन, कारण तशी मी इच्छा केली.


त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की,


मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.


परमेश्वराची, आमच्या देवाची थोरवी गा व त्याच्या पादासनापुढे नमन करा; पवित्र तोच आहे.


माझे पवित्रस्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल; अर्थात सुरू, देवदारू, भद्रदारू हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील; माझे पादासन मी शोभायमान करीन.


परमेश्वर म्हणतो, “आकाश माझे सिंहासन व पृथ्वी माझे पादासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? मला विश्रांतीसाठी कोणते स्थळ असणार?”


हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.


तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, हे माझ्या सिंहासनाचे स्थळ, माझ्या पदासनाचे स्थळ आहे; तेथे मी इस्राएल वंशजांमध्ये सर्वकाळ राहीन; इस्राएल घराण्याचे लोक व त्यांचे राजे आपल्या व्यभिचाराने व त्यांच्या राजांनी स्थापलेल्या प्रेतवत मूर्तींनी आपल्या उच्च स्थानांवर ह्यापुढे माझ्या2 पवित्र नामाला बट्टा लावणार नाहीत;


ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.


परमेश्वर म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे; तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?


तर तुझा देव परमेश्वर ज्याला निवडील त्यालाच तू आपल्यावर राजा नेमावेस; आपल्या भाऊबंदांतून आपल्यावर राजा नेमावास; तुझ्या भाऊबंदांपैकी नाही अशा कोणाही परदेशीयाला आपल्यावर नेमू नयेस.


असे केल्याने त्याचे हृदय आपल्या भाऊबंदांच्या बाबतीत उन्मत्त होणार नाही आणि तो ह्या आज्ञेपासून बहकून उजवीडावीकडे वळणार नाही; तसेच तो व त्याचे वंशज इस्राएल लोकांमध्ये चिरकाल राज्य करतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan