१ इतिहास 28:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएलाचे सर्व सरदार म्हणजे वंशावंशांचे सरदार, राजाची पाळीपाळीने सेवा करणार्या तुकड्यांचे सरदार होते; तसेच सहस्रपती, शतपती, राजा व त्याचे पुत्र ह्यांच्या संपत्ती व पशुधनावर देखरेख करणारे सरदार आणि शूर वीर ह्या सर्वांना दाविदाने यरुशलेम येथे जमवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाने इस्राएलातील सर्व अधिकारी, वंशावंशाचे प्रमुख, पाळीपाळीने राजाचे काम करणारे सरदार, हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार, राजाच्या व त्याच्या मुलांच्या सर्व संपत्तीवरील व धनावरील अधिकारी, अंमलदार, शूर वीर आणि लढवय्ये यांना यरूशलेमेत एकत्र बोलावले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता. Faic an caibideil |